Home Uncategorized अहमदनगर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाअधिकारी कार्यालयाचे उदघाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जसंधारण...

अहमदनगर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाअधिकारी कार्यालयाचे उदघाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते संपन्न, कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची दांडी

अहमदनगर दि २९ डिसेंबर
अहमदनगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख अहमदनगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले पाटील, खा.सदाशिव लोखंडे,आ डॉ.सुधीर तांबे आ.बबनराव पाचपुते,आ.लहू कानडे जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी श्री राजेंद्र भोसले पद्मश्री पोपटराव पवार पद्मश्री राहीबाई पोपरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्यासह इतर मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली.अहमदनगर मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय,आरटीओ कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा न्यायालय, आशा सर्व कार्यालय नूतन वास्तूत स्थलांतरित झाल्या होत्या मात्र जिल्हाधिकारी कार्यालय अनेक वर्षांपासून जुन्या वास्तुस होते मात्र आता नूतन कार्यालयात स्थलांतरीत होत आहे.

या उदघाटन प्रसंगी बोलताना राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्या मध्ये एक अतिशय सुंदर कलेक्टर ऑफिसचे उद्घाटन आज आपण केलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते मात्र  मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री आजारी पडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.नूतन इमारत अतिशय सुसज्ज चांगली बांधलेली आहे. त्यामुळे माझी विनंती असणार आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत इतर सरकारी कार्यालयांना देण्यात यावी अशी मागणी त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली.या नूतन इमारती मधून जनतेचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे आणि जलदगतीने व्हावे आशा सदिच्छा व्यक्त केली.

 पालकमंत्री काही करणार मुळे उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी ऑनलाईन उपस्थिती होती.

या वेळी बोलताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या नूतन इमारतीच्या सुरुवातीच्या आठवणी सांगत ही इमारत महसूल मंत्री झाल्या नंतर माझे पाहिले स्वप्न होते की आपल्या जिल्ह्यातील जिल्हधिकारी कार्यालय सुसज्ज आणि सर्व सोयीनियुक्त असावे त्या मुळे महसूल मंत्री झाल्या नंतर या इमारती बाबत मंत्री मंडळात इमारती साठी निधी मंजूर केला आणि २०१४ पासून सुरू झालेल्या इमारतीचे काम आज पूर्ण झाले. याचे समाधान असून योगा योगाने या इमारतीचे भूमिपूजन आणि उदघाटन माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे.या इमारती मधून लोकाभिमुख काम करा आलेल्या सर्वसामान्य माणसाचे काम करा आणि सरकारचा चेहरा म्हणून तुम्ही काम करत आहात हे लक्षात ठेवून काम करा असा सल्ला त्यांनी महसूल अधिकारी आणि कर्मचार्यांना दिला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करत नूतन कार्यालयाची माहिती दिली नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल विभागा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहीती दिली.

तर पद्मश्री पोपटराव पवार यांनी या प्रसंगी बोलताना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय करावे अशी मागणी केली शहर आणि ग्रामीण तहसील कार्यालय एकत्र असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे काम लवकर होत नाही त्यासाठी प्रयत्न करावे असं सांगितलं.अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

“या कार्यक्रमाला भाजपचे दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप,आमदार रोहीत पवार, आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार  किरण लहमटेभाजपच्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे,कॉंग्रेस शहरअध्यक्ष किरण काळे,यांची अनुपस्थि होती”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version