Home जिल्हा अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन नांदगाव शिवारात फुटल्याने उद्या काही उपनगरांचा...

अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन नांदगाव शिवारात फुटल्याने उद्या काही उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर दि.२८ –

सोमवारी दुपारच्या सुमारास अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी (७०० एम.एम. सी.आय.) नांदा शिवारात हॉटेल गुरुनानक समोरील ठिकाणी पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटल्याने महानगर पालिकेने काम तातडीने हाती घेतले होते
मात्र दुरुस्ती कामास अवधी लागणार असल्याने व दरम्यानच्या काळात सदर जलवाहिनी मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने आज (सोमवारी) होणार पाणी पुरवठा मंगळवारी होणार असल्याचे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

या भागात होणार होता पाणीपुरवठा बोल्हेगाव, पाईपलाईन रोड परिसर व केडगाव मंगळवार दि.१-३-२०२२ रोजी नेहमीच्या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करू महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version