अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर शहरात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आता तर चक्क निधीतील प्रदूषणामुळे त्या ठिकाणी फेस येऊन रस्ता आडवल्या चे चित्र नगर शहराचा शेजारून जाणाऱ्या वाकोडी ते वाळकी या रस्त्यावर दिसून आलंय. नगर शहरातुन वाहणारी सीना नदी किती प्रदूषित आहे याचं उदाहरण या साचलेल्या फेसा वरून लक्षात येत आहे. या मुळे चक्क रस्ता जाम झाल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते मात्र या प्रदूषणाकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आज या सर्व प्रदूषणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून याकडे लक्ष वेधले आहे.

विशेष म्हणजे या सीना नदीवर पुढे कर्जत तालुक्यात मोठे धरण असून अनेक गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीला पाणी दिले जाते. त्यामुळे भविष्यात मोठ्या गंभीर आजारांना समोर जावे लागणार असल्याने आत्ताच या प्रदूषणाची दखल घेऊन योग्य ते कारवाई करणे गरजेचे आहे.