कर्जत दि २२ फेब्रुवारी
संसदेत भाषण करताना खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर चांगलीच टीका केली होती त्या नंतर खा.सुप्रिया सुळे यांनी त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते त्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते.
खा डॉ. सुजय विखे पाटील राहता येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मात्र काल वेगळे चित्र कर्जत मध्ये पाहायला मिळालं.
माजी मंत्री भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कर्जत मध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांची आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली या वेळी दोघांनी मिळून कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर दोघांचाही गप्पांचा फड रंगला आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे गर्दी पासून थोडे बाजूला जाऊन गप्पा मारत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर या ठिकाणी उपस्थित झालेले राम शिंदे यांनी तेथून जाणे पसंत केले गप्पा संपल्यानंतर रोहित पवार यांनी विखे पाटलांना थेट गाडी पर्यंत सोडले.