Home सांस्कृतिक आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुरव्या मुळे प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर...

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुरव्या मुळे प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर नाट्यगृहाच्या छताच्या लोखंडी कैची बसवण्याचे काम सुरू

अहमदनगर दि २० फेब्रुवारी

आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ५ कोटींचा निधी नाट्यगृहासाठी मिळविल्या मुळे महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेले नाट्यगृहाच्या कामाने आता चांगलाच वेग पकडला आहे. आता ही वास्तू आकार घेताना दिसत असून नाट्यगृहाचा साचा बऱ्यापैकी पूर्ण झलेला आहे.

नाट्यगृहा वरील छता वरील लोखंडी कैची टाकण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे या भल्या मोठ्या लोखंडी कैची टाकण्यासाठी सध्या प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाच्या कामाच्या ठिकाणी मोठमोठ्या क्रेन आल्याअसून छतासाठी लोखंडी कच्च्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे लवकरच हे काम अंतिम टप्प्याकडे जात असल्याने अनेक वर्षांचा नाट्यगृह स्वप्न पूर्ण होतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतय.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version