मुंबई
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्ड ला लागलेल्या आगीत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता.याला कारणीभूत ठरवून शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक,डॉक्टर आणि परिचरिका यांच्यावर शासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली तर एका वैद्यकीय अधिकारी 64 परिचारिका अन्वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग आता डॉक्टरांची जबाबदारी काय व अग्निशमन व इलेक्टरीक यंत्रणांची जबाबदारी काय यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केला आहे.जर खाजगी रुग्णालयात आग लागून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार म्हणून मालकावर कारवाई केली जाते.त्याच न्यायाने शासकीय रुग्णालयाचे मालक व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरून कारवाई का करू नये असा देखील सवाल आयएमए उपस्थित केला आहे.तसेच यासंबंधी नियोजित अध्यक्ष रामकृष्ण लोंढे व सचिव पंकज बंदरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची गुरुवारी भेट घेतली असून.यासंबंधी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडून देण्यात आले.