Home शहर एका मोठ्या वृत्तवाहिनीचे नाव सांगत अधिकाऱ्याला पैशाची मागणी आशा तोतया मुळे होतोय...

एका मोठ्या वृत्तवाहिनीचे नाव सांगत अधिकाऱ्याला पैशाची मागणी आशा तोतया मुळे होतोय पत्रकारांची बदनामी

अहमदनगर दि.१४ एप्रिल

सरकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पत्रकार असल्याचे सांगत पैसे मागणाऱ्यांची जमात सध्या चांगलीच जोमात आहे विशेषतः जिल्हा परिषद, बांधकाम खाते, इरिगेशन,आशा कार्यालयात या लोकांचा चांगला राबता असतो कोणत्याही वाहिनीचे नाव सांगून बातमी लावतो असे म्हणत पैसे उकळण्याचा यांचा धंदा असतो अधिकारी सुद्धा कधी कधी नको ती कट कट म्हणून शे पाचशे देऊन अशांना वाटे लावतात.

नगर शहरातील एका जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या एका कार्यालयात अशीच एक घटना घडली असून एका जबाबदार आणि महत्वाचे खात्याच्या कारभार सांभाळणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या दालनात दोन दिवसांपूर्वी एक इसम एका वृत्तवाहिनीचा पत्रकार म्हणून गेला आपली ओळख करून देताना त्याने आकाशासाला गवसणी घातली गळ्यात मोठी चैन कानात डुल गळ्यात ओळखपत्र त्याच्यावर भलंमोठं वृत्तवाहिनीचे नाव असलेल्या पहेरवात तो अधिकाऱ्या समोर जाऊन बसला आणि तुमच्या बाबत आमच्या मोठ्या वृत्तवाहिनीला बातमी लागणार आहे त्यासाठी मी या ठिकाणी आलो असून चर्चा सुरू केली शेवटी अर्धा तासाने बातमी थांबवायची असेल तर विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी करू लागला.

त्या जबाबदार अधिकाऱ्याला त्या पत्रकारा बद्दल संशय आला त्याने सुद्धा त्या पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली मात्र तो पत्रकार शेवटी त्याच्या लायकीवर आला आणि गाडीच्या डिझेल साठी पैसे तरी द्या म्हणून मागणी करू लागला मात्र त्या अधिकाऱ्याने त्याला चहा पाजून पाठवून दिले.

नगर शहारात या आधी असेच एका मोठ्या वृत्तवाहिनीचा पत्रकार म्हणून एका ठेकेदाराला खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्याच्याकडे सुद्धा वृत्तवाहिनीचे खोटे ओळखपत्र माईक आयडी होते मात्र ठेकेदाराला त्याचा खोटेपणा लक्षात आल्याने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.

आशा तोतया पत्रकारांमुळे खरं काम करणाऱ्या पत्रकाराची बदनामी होते त्या मुळे कोणीही असा पैसे मागणार पत्रकार आला तर त्याची खात्री करणे गरजेचे आहे अथवा आशा तोतया पत्रकारांना पकडून देणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version