Home शहर कष्टकरी पथविक्रेत्यांच्या पोटावर मारली लाथ साहेब कोण देणार आम्हाला साथ ! कापडबजार...

कष्टकरी पथविक्रेत्यांच्या पोटावर मारली लाथ साहेब कोण देणार आम्हाला साथ ! कापडबजार पथविक्रेत्यांचा वाली कोण?

अहमदनगर दि.२३ मार्च ( सुशील थोरात)
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ मधील पथविक्रेत्यांना हटवून बाहेर काढल्यामुळे कापड बाजार मधील रस्ते सध्या भव्यदिव्य दिसत आहेत. मात्र येथून हटवलेल्या पथविक्रेत्यांच्या समोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो आपल्या रोजीरोटीचा त्यामुळे या पथविक्रेत्यांचा बाबत महानगरपालिकेने तसेच राजकीय पुढाऱ्यांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या सामाजिक संघटनांनी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा एक दिवशी या शांततेचा भंग झाल्याशिवाय राहणार नाही.

मुख्य बाजारपेठेत व्यापारी आणि पथविक्रेत्यांच्या वादानंतर व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतील आणि त्यानंतर पथविक्रेत्यांना हटविण्यात आले महानगरपालिकेनी जेवढ्या जलद गतीने पथविक्रेत्यांना बाहेर काढण्याबाबतची भूमिका घेतली तेवड्याच जलद गतीने महापालिकेने पथविक्रेत्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते मात्र कापड बाजारात सध्या पथविक्रेत्यांच्या आणि व्यपऱ्याच्या अडून राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय. नगर शहरात कोणताही प्रश्न असो तेथे राजकारण झाल्याशिवाय कोणताच प्रश्न सुटत नाही हे सत्य आता सर्व नगरकरांना माहीत झाल आहे. जेवढी चूक पथविक्रेत्यांची आहे त्या प्रमाणात थोडीफार का होईना व्यापाऱ्यांची पण चूक आहे. ज्या वेळेसच पथविक्रेते सुरुवातीलाच अतिक्रमण करत होते तेव्हाच त्यांना विरोध केला असता तर आज एवढी मोठी परिस्थिती उद्भभली नसती आणि पथविक्रेत्यांनी त्यांना दिलेल्या शरण मार्केट मध्ये मोठे मार्केट उभा केले असते तर आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली नसती.

सध्या पथविक्रेते जरी शांत दिसत असले तरी ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय कारण एक दिवस दुकान बंद राहिले तर प्रचंड आर्थिक उलाढालीचा फटका बसतो आता या पथविक्रेत्यांना हटवून एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले असल्यामुळे त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पोटाची भुक काहीही करायला लावते असं म्हणलं जातं त्यामुळे प्रशासनासह सर्वच राजकीय नेत्यांनी संघटनांनी जेवढा विचार व्यापाऱ्यांचा केला तेवढाच विचार या पथविक्रेत्यांचा करणे गरजेचे आहे नाहीतर ही वादळापूर्वीची शांतता पुढे काहीही घडूवू शकते हे निश्‍चित

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version