Homeक्राईमकॅम्प पोलीस स्टेशन आणि गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम ६५ बेवारस...

कॅम्प पोलीस स्टेशन आणि गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम ६५ बेवारस वाहन मालकांचा लागला शोध

advertisement

अहमदनगर दि १६ मार्च

वाहनांचा अपघात,वाहनांची चोरी,किंवा अनेक गुन्ह्यात वाहनांचा वापर होत असल्याने पोलीस विविध गुन्ह्यात शेकडो वाहने जप्त करत असतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने ही वाहाने पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मलकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडून आहेत.

त्यामुळे पोलीस ठाण्याचा परीसर बकाल व विचित्र दिसून येतो.त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत असल्याने भिंगार येथील कॅम्प पोलीस स्टेशन ने बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात 65 वाहनांचे मूळ मालक शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील पंदरवाडी येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने  भिंगार पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.

बेवारस पडलेल्या वाहनांचे चेसीस व इंजीन नंबर वरून 08 दिवसांत एकून 65 वाहनांचे मुळ मालकांचा शोध पोलीस आणि गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने घेतला आहे.

पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक सौरव कुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक  शिशिरकुमार देशमुख,पो उप निरीक्षक  सतिष शिरसाठ ,मुद्देमाल कारकून सफौ.आर. एस.वैरागर, पोना राहुल राजेंद्र द्वारके , पोना संतोष आडसुळ व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत,उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे ,भारत वाघ,गोरख नवसुपे,संजय काळे यांनी ही कामगिरी केली आहे.

शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली
वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन परत घेऊन जाण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. कॅम्प पोलीस
स्टेशनच्या आवारात 82 गाड्या पडून आहेत.त्यापैकी 65 वाहन मालकांचा शोध लागला असून बाकी वाहन
|मालकांचा शोध लावण्याचा तपास चालू आहे.

तरी वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक ,वाहनाचा प्रकार,चेसीस नंबर,इंजीन नंबर ,वाहन मालकाचे नाव ,पत्ता यांची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेली आहे. तसेच सोबत वाहानांची यादी सादर केली आहे. सदर यादी मध्ये आपले वाहन /नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवून आपले वाहने घेऊन जावीत पोलिसांनी संबंधित वाहन मालकांना तशा आशयाचे पत्र पाठवले असून गाडी मालकांनी पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत वाहने घेऊन जावे अन्यथा ही वाहने बेवारस आहेत असे समजून त्यांचा लिलाव करण्यात येईल असे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगीतले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular