अहिल्यानगर दिनांक 20 डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेतील मार्केट विभागातील कर्मचारी उमेश दिगंबर शेंदुरकर आणि अमित राजू पालवे यांची मोबाईल वरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सकाळपासून चांगलेच व्हायरल होत आहे या संवादामध्ये त्यांनी शहरातील काही अतिक्रमण केलेल्या आणि रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांकडून पैसे घेऊन ते काही अधिकाऱ्यांना दिल्याचे संभाषण करण्यात आले होते.
ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या दोन्हीही कर्मचाऱ्यांचे सेवा निलंबन करत विभागीय चौकशी लावण्याचे आदेश दिले आहेत.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उप आयुक्तांच्या अहवालानुसार उमेश दिगंबर शेंदुरकर यांनी मद्यप्राशन करुन तसेच अमित राजू पालवे या दोघांनी गैरवर्तन करून कार्यालयीन वातावरण दुषित करणे, कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्य पारायणता न राखणे, बेजबाबदारपणा कारणास्तव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५६ (२) (फ़) मधील तरतूद व खालील अटी शर्तीनुसार सेवा निलंबन करुन महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्यात येत असल्याचा अहवाल दिला आहे.