अहमदनगर दि १८ मार्च
अनेक दिवसांपासून मार्केट यार्ड चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी महानगरपालिकेत काही संघटनांनी आंदोलनही केले होते.
शनिवारी एका पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कामाचा भूमिपूजन समारंभ करावा अन्यथा नि काही शासकीय अधिकाऱ्याला डॉ. बाबासाहेब च्या पुतळ्यास हार अर्पण करू दिला जाणार नाही असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
या पत्रकार परिषदेला अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, प्रतीक बारसे, बंडू आव्हाड, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, बंटी भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, संतोष जाधव, संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
मार्केटमध्ये सध्या ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी महापालिकेच्या जागेत सुशोभीकरण करून पूर्णाकृती पुतळा उभा करण्याची विविध आंबेडकरी संघटनांची मागणी आहे. मात्र महानगरपालिकेने आज पर्यंत या जागेचा वाद न्यायालयात असल्याचे सांगून वेळ घालवला असल्याचा आरोप या वेळी महापालिका प्रशासनावर करण्यात आला वास्तविक पाहता अहमदनगर शहराचे नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर तसेच त्यांच्या पत्नी यांच्या लोकयुग या ऑफिसचा आणि तत्कालीन नगरपालिकेचा वाद न्यायालयात असल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की नवनीतभाई बार्शीकर आणि त्यांच्या पत्नी स्वर्गवासी झाल्या असून त्यांचा एक मुलगा भरता बाहेर दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थायिक झाला आहे त्यामुळे महानगरपालिका वेळकाढूपणाचे काम करत असून महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला नाही तर पुढील काळात आंबेडकरवादी सर्व संघटना आक्रमक भूमिका घेतील असा इशाराही या वेळी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचीआणि कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे
( नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समिती पदाधिकारी खालील प्रमाणे ) अजय साळवे, रोहित आव्हाड, सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, किरण दाभाडे, सुशांत महस्के, सुनील शिंदे, योगेश थोरात, संतोष जाधव, नाथा अल्लाट, सुनील शेत्रे, सदाशिव भिंगारदिवे, वैभव कांबळे, सचिन शेलार, विशाल गायकवाड, प्रवीण चाबुकस्वार, जय कदम, सोमा शिंदे, विजय गायकवाड, संभाजी भिंगारदिवे, झेवियर भिंगारदिवे, अनिल शेकटकर, संजय जगताप, वृषाल साळवे, विशाल कांबळे, पिटू माघाडे,. ( नियोजन व व्यवस्थापन समिती प्रमुख ). बंटी भिंगारदिवे, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, दिनेश पंडित, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे,. (. सोशल मीडिया प्रमुख ). अमित काळे, योगेश साठे, संदीप राजापुरे, नाना पाटोळे, विशाल पवार, सर्पमित्र आकाश जाधव,. ( प्रसिद्धीप्रमुख ). महेश भोसले, नितीन कसबेकर, सिद्धार्थ आढाव, संदीप वाघमारे, सचिन मोकळ,. ( संयोजन समिती ). भरत कांबळे, पवन भिंगारदिवे, सुजित घंगाळे, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विवेक भिंगारदिवे, संतोष जाधव, मेजर राजू शिंदे, समीर भिंगारदिवे, अविनाश शिंदे, सुरज कांबळे, भाऊ साळवे, अक्षय भिंगारदिवे, प्रतिक जाधव, अविनाश भोसले, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, मनोज ठाकूर, आकाश गायकवाड, दानीश शेख, शफी शेख, संदीप शिंदे, विजय महस्के, तुकाराम गायकवाड, मृणाल भिंगारदिवे, अजिंक्य भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, वैभव जाधव, दया गजभिय, शनेश्वर पवार, सनी माघाडे, अतुल भिंगारदिवे, दीपक लोंढे, गौरव भाकरे, यशवंत भांबळ, सारंग पाटेकर, अंकुश मोहिते, जयंत भिंगारदिवे, अमोल तडके, अभिजित भिंगारदिवे, किरण जाधव, शुभम बडेकर, हर्षल कांबळे, आकाश तांबे, प्रवीण कांबळे, दिलीप कांबळे, मेहेर कांबळे, अमोल शिंदे, सागर चाबुकस्वार, सिमोन भाकरे, नितीन साळवे, आकाश सरोदे, जॉन पाटोळे, विलास उबाळे,. ( सल्लागार व मार्गदर्शक समिती ). अशोकराव गायकवाड, अँड.संघराज रुपवते, प्रा.जयंत गायकवाड, प्रा.विलास साठे सर, डॉ.प्रदीप तुपेरे, प्रा.डी आर जाधव, इंजि.परिमल निकम, इंजि.महेंद्र राजगुरू, भगवानराव जगताप, नगरसेवक विजय गव्हाळे, विजयराव भांबळ, प्रा. भीमराज पगारे, रवींद्र कांबळे, ॲड.संदीप पाखरे, ॲड कश्यप तरकसे, प्रा.डॉ.रत्ना वाघमारे, सुनील भाकरे, इंजि.संजय गायकवाड, उमाशंकर यादव, भगवान साळवे, पोपटराव जाधव, अण्णासाहेब गायकवाड, जितू मामा पाटोळे, अनंत लोखंडे, ॲड.प्रकाश राव गायकवाड, एकनाथराव जाधव, जीवन हरी पारदे,. ( महिला समिती ). गौतमी भिंगारदिवे, अनुसया भाकरे, सौ.जयाताई गायकवाड, संपदा म्हस्के, हिराबाई भिंगारदिवे, संगीता भिंगारदिवे, सुनिता नेटके, मायाताई गायकवाड, अनुराधा साळवे, विनिता सूर्यवंशी, आरती बडेकर, ज्योतीताई पवार, माया निळे आदींची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.