अहमदनगर दि १९ मार्च
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती येत्या २१ तारखेला साजरी होणार आहे या साठी शहारत जोरदार तयारी सुरू असून जवळपास आठ ते नऊ मंडळांनी शिवजयंती मिरवणुकीसाठी डीजे सह परवानगी मिळावी म्हणून पोलीस प्रशासना कडे अर्ज केले आहेत.
विशेष म्हणजे या वर्षी भाजपच्या वतीने पहिल्यांदाच शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी यांनी हिंदूराष्ट्र सेनेच्या साथीने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत तर शहर शिवसेना युवासेना आणि शिवसेनेचे शहर प्रमुख यांच्या मंडळांनी मिरवणूक काढण्यासाठी अर्ज केले आहेत.
शिवजयंती मिरवणूक ही वाजत गाजत व्हावी अशी सर्व नगरकारांची इच्छा आहे मात्र ती पारंपरिक ढोल ताशा ,लेझीम, शिवकालीन लढाईत वापरणारे दांड पट्टे, लाठी ,यांच्या प्रत्यक्षीकातून व्हावी अशी इच्छा सर्वसामान्य नगरकर व्यक्त करत आहेत.
डिजेचा गोंगाट आणि त्यावर विक्षिप्तपणे नाचगाणे करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम शिवभक्तांनी करू नये कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि आचार प्रत्यक्ष जीवनात अमलात आणले तरच पुढील पिढीला त्यांचा इतिहास कळेल हिडीस गाणे लावून नाचगाणे करून आपण नवीन पिढीला आपण काय संदेश देणार आहोत अशी भावना काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलीस प्रशासना कडे मंडळांनी डीजे सहित परवानगी मिळावी असा अर्ज केले असले तरी कोणत्याही मंडळाला डीजे लावण्याची परवानगी नसून संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे