Home जिल्हा खा. सुजय विखे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तो फोटो झाला चर्चेचा...

खा. सुजय विखे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तो फोटो झाला चर्चेचा विषय

अहमदनगर- ६ एप्रिल

अहमदनगर जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शिर्डीतील पोलीस स्टेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सुजय विखे पाटील सुद्धा हजर होते.

या कार्यक्रमाच्या वेळी खा. सुजय वीखे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी जाऊन कानात काही तरी बोलले आणि अजित पवारांनी हात जोडले हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून खा. सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानात काय सांगितले याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.

विखे आणि पवार कुटुंबामधील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे मागील महिन्यात संसदेत खा विखे आणि खा सुप्रिया सुळे यांनी चांगकीच टोलेबाजी केली होती मात्र आज खा. विखे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावरची उपस्थती चांगलीच चर्चेचा विषय बनली होती

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version