Home विशेष ‘चला आज बसू’ म्हणणार्या तळीरामांना खुश खबर दारू झाली स्वस्त,कसलीही मागणी न...

‘चला आज बसू’ म्हणणार्या तळीरामांना खुश खबर दारू झाली स्वस्त,कसलीही मागणी न करता सरकारने दिले गिफ्ट

मुंबई — जनतेला सर्वच ठिकाणी महागाईशी सामना करावा लागत असतानाच महाराष्ट्र सरकारने मात्र विशिष्ट व्यक्तींच्या खिशाचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘रात्री बसणाऱ्या’ व्यक्तींच्या खिशाचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. कोणतीही मागणी न करता, कसलाही बंद, आंदोलन न करता सरकारकडून अनपेक्षितपणे मिळालेले हे गिफ्ट पाहून ‘ड्राय डे’ दिवशी दुप्पट किंमत देणाऱ्या या जनतेच्या आनंदाची सीमा उरली नाही.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दा’रू’पासून सर्वाधिक महसूल मिळतो. अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, स्कॉ’च व्हि’स्की’वरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्च 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉ’च’च्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो.केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्स9साईज ड्युटी कमी केल्यानंतर विविध राज्यांनी देखील त्यावरील एक्ससाईज ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे देखील जनतेने ही मागणी लावून धरली होती, परंतु राज्य सरकारने या गोष्टीला बगल देत भलत्याच गोष्टीचा टॅक्स कमी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version