Home विशेष चायना मांजा मुळे महिला गंभीर जखमी, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

चायना मांजा मुळे महिला गंभीर जखमी, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

औरंगाबाद दि.६ जानेवारी

चायना मांजा वापरण्यास बंदी घातलेली असतानाही महाराष्ट्रात अनेक शहरात चोरी छुपे तर काही ठिकाणी सर्रास उघडपणे या मांजची विक्री सुरू आहे. औरंगाबाद येथील गुलमंडी परिसरात काल बुधवारी असाच एक अपघात घडला. दुचाकीवरील महिलेच्या गळ्याला या मांजामुळे दुखापत झाली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे ही महिला थोडक्यात वाचली.या महिलेवर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मात्र या महिलेला आपल्या गळ्याला मांजाचा स्पर्श झाल्यावर त्यांनी लगेच गाडी थांबवली तरीही त्यांच्या गळ्याला इजा झाली जर गाडीचा वेग जास्त असता तर मोठी घटना घडली असती.चायना मांजा मुळे दरवर्षी अनेक घटना घडतातअनेकांच्या जीवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेत. पक्ष्यांनाही ईजा होते मात्र तरीही चायना मांजा पतंग मार्केट मध्ये सर्रास विकला जातोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version