अहमदनगर दि ८ मार्च
आज जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनीही कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे.
पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात चूल मूल सांभाळत त्यांना पोलीस कर्तव्यही पार पाडावे लागते यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत जीवन जगावे लागत असतानाही अनेक महिला पोलीस कर्मचारी यशस्वीरित्या हा सर्व कारभार सांभाळत आहेत या सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असलेल्या महिलां कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे तो आपल्याला मोठा मान मिळाला असल्याचं संपत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांचं काम 24 तास दिवसरात्र सुरू असतं मात्र महिला कुठेही या कामात कमी पडत आणि कधीच थकत नाहीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिला पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन मध्ये पार पाडत असतात त्यामुळे यांचा सन्मान एक मोठी गोष्ट असल्याचे संपत शिंदे यांनी सांगितले