दिल्ली –
रिझर्व्ह बँकेने अहमदनगरच्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँकेला चांगलाच झटका दिला आहे.रिझर्व्ह बँकेने या बँकेवर काही निर्बंध घातले आहेत.रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतर नगर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या बँकेच्या आर्थिक स्थितीत गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरबीआयने हे पाऊल उचलले.रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात म्हटले आहे की, आरबीआयची मंजुरी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण किंवा पेमेंट करू शकत नाही किंवा नवीन कर्ज देऊ शकत नाही. बँक कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व पूर्ण करू शकत नाही किंवा कोणतेही पेमेंट जारी करू शकत नाही. तसेच ही बँक आरबीआयकडून सूचना मिळाल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.RBI ने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट (सहकारी संस्थांना लागू असलेल्या नियमांनुसार) १९४९ अंतर्गत ही कारवाई केली. आरबीआयच्या या सूचनेनंतर निर्बंधांचा कालावधी पुढील सहा महिन्यांसाठी कायम राहणार आहे, जो ६ डिसेंबरपासून लागू झालाय.
रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार,सहा महिन्यांनंतर बँकेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाईल आणि पुढील सूचनांचा विचार केला जाईल. सर्व काही सुरळीत झाले तर निर्बंधात शिथिलता येईल, अन्यथा परिस्थिती जैसे थेच राहील. आरबीआयच्या या आदेशामुळे बँकेच्या खातेदारांना मध्ये आणि धारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे मागील आठवड्यातच बँकेची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ आले असताना त्यांना हा आरबीआयने दिलेला मोठा झटका आहे.