अहमदनगर प्रतिनधी
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क)च्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. निवडणूक आयोगाने दोन तासाची मुदत वाढून दिल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले.प्रभाग क्रमांक ९ साठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनुराधा अजय साळवे, अजय साळवे, सुरेश रतनप्रसाद तिवारी,प्रदीप अमरसिंग परदेशी, अभिजीत विठ्ठल चीप्पा, गुंडला ऋषिकेश बलैया, अमित दीपक चव्हाण, कैलास बाबुराव शिंदे, शदाब आरिफ शेख, वंदना गणपत शेकटकर, पाथरे पोपट भानुदास,गौरव अरुण ढोणे, संदीप वाघमारे, या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.मात्र अर्ज माघारी नंतरच नेमकी लढत कशी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे सध्यातरी सर्वच पक्षांनी थांबा आणि पहा याची भूमिका घेतली आहे.