दिल्ली – ११ डिसेंबर
झिंगाट होऊन थेट एका हिंदी वृत्तवाहिनी साठी एका गंभीर विषयावर आपले मत मांडत असताना एक जेष्ठ पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. देशाचे सी डी एस बिपीन रावत हे ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते त्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन c d s बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर मधील त्यांच्या सहकाऱ्यांचे निधन झाल्या नंतर सर्वच देशावर शोककळा पसरली. या बातमीचे विश्लेषण थेट दारू पिऊन केल्याचा आरोप सध्या त्या हिंदी वृत्तवाहिनीच्या त्या जेष्ठ पत्रकारावर होतोय मोहम्मद जुबेर यांनी ट्विटर वर तो व्हिडीओ अपलोड करत चांगलीच टीका केलीय. देशाने एक महान व्यक्ती गमावल्यानंतर सर्वच ठिकाणी शोककळा पसरली असताना या महाशयांनी थेट दारू पिऊन बिपीन रावत यांच्या सारख्या महान व्यक्ती बद्दल बोलणे कितपत योग्य आहे असा सवाल आता सोशल मीडिया विचारला जातोय.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जा👇
https://twitter.com/zoo_bear/status/1469571847045795841?t=DcfB_57-yiemt-ZnHlbjfA&s=19