Home Uncategorized टिच भर पोटा साठी अल्पवयीन मुलं करतात कष्टाची कामे तर दोन वर्षांच्या...

टिच भर पोटा साठी अल्पवयीन मुलं करतात कष्टाची कामे तर दोन वर्षांच्या चिमुरड्याला घेऊन आई थेट कामावर हजर, नगरच्या चितळे रोडवर ह्रदय हेलवणारे दृश्य

अहमदनगर दि.११ डिसेंबर
पोटाची भूक काय करायला लावेल हे सांगता येत नाही. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातल आणि अनेकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.त्यामुळे मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह कसा करता येईल याकडेच अनेकांचा कल आहे. सध्या अहमदनगर शहरा मध्ये महानगरपालिकेच्या वतीने चितळे रोडवर पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही अल्पवयीन मुलेही कामगार म्हणून काम करत आहेत.

ज्या वयात हातात पुस्तक घ्यायचे असून त्या वयात त्या हाताने अवजड काम करताना चित्र पाहून निश्चितच मन हेलावून जातो मात्र पोटाची भूक हे काम करा लावते हे नक्की.तर आपल्या तान्हुल्याला घेऊन एक महिला काम करतानाचे दृष्य पाहून मन सुन्न होत हे सर्व कामगार परप्रांतीय आहेत. काही ठिकाणी कामगारांची टंचाई निर्माण झाल्याने अनेक परप्रांतीय कामगार आता विविध ठिकाणी दिसू लागले आहेत.लॉकडाऊन मुळे आलेली परिस्थितीला समोर जाण्यासाठी जे हाताला येईल ते काम करण्याचा प्रयत्न सध्या हे परप्रांतीय मजूर करताना दिसत आहेत.त्यामधीलच एक हृदयस्पर्शी चित्र आज नगर शहरातील चितळेरोड वर पाहायला मिळाल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version