अहमदनगर -सुथो-
अहमदनगर जिल्हा अधिक्षक मनोज पाटील यांनी चेन स्नॅचिंग आणि बॅग लिफ्टिंग चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी नुकतेच उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या सह संजय खंडागळे, राजेंद्र वाघ, बापू फोलाने यांचे एक पथक स्थापन केले होते.हे पथक स्थापन झाल्यानंतर दोनच दिवसात धूम स्टाईल चोरट्यांनी पथकाला सलामी दिली होती. नगर शहराच्या उपनगरातील समता नगर आणि पाईपलाईन रोड भागात धूम स्टाईल चोऱ्या करून महिलांच्या गळ्यातील सोने चोरून नेले होते . याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्येसुथो गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर तोफखाना पोलिसांसह नव्याने स्थापन झालेल्या या पथकाने तपास सुरू केला असता पुणे येथे एक आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपनिरीक्षक सोपान गोरे . संजय खंडागळे, राजेंद्र वाघ, बापू फोलाने यांनी पुणे येथे जाऊन सापळा रचून शब्बीर खान इराणी याला ताब्यात घेतले आहे सफिर उर्फ शब्बीर फिरोज खान इराणीवर पुण्यातील एक असे ठिकाण नाही जेथे त्याने धूम स्टाईलने चोऱ्या केलेल्या नाहीत जवळजवळ 35 ठिकाणी त्याने धूम स्टाईल चोरी केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. तोच आता नगर मध्ये येऊन सुद्धा चोरी करत असल्याचं निष्पन्न झाले आहे. शब्बीर खान याला ुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून शब्बीर खान यांच्याकडून नगर शहरातील धूम स्टाईल ने केलेल्या अनेक चोर्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.