Home जिल्हा तर मग ठरलं … जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘या’ तारखेला होणार नवीन वास्तूत स्थलांतर

तर मग ठरलं … जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘या’ तारखेला होणार नवीन वास्तूत स्थलांतर

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय काही दिवसातच नवीन वास्तूत स्थलांतरित होणार असून नगर औरंगाबाद रोड वरील शासकीय विश्रामगृहाच्या मागील मोकळ्या जागेत भव्यदिव्य असे अत्याधुनिक पद्धतीने सर्व सोयींनी युक्त असे जिल्हाधिकार्यालयाचे काम पूर्णत्वास आले असून.जुन्या जिल्हाधिकारी कार्यलयात आता नवीन वास्तूत जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना नवीन जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कामास मंजुरी दिली होती.

त्यानंतर मधल्या काळात अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या कामास पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आल्या पासून गती मिळाली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे असा आग्रह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा असून येत्या सात डिसेंबर पासून काही विभागांचे काम नूतन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम सुरू असून काही अधिकारीही या ठिकाणी ठाण मांडून आहेत कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बसलेला फटका पाहता नूतन कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम कार्यक्रम साधेपणाने होणार का मोठ्या बडेजावात होणार याबाबत अद्यापही काही ठरलेले नाही. महसूल प्रशासनाकडून कोणतीही माहिती नसली तरी नूतन कार्यालयाच्या परिसरात जी लगबग सुरू आहे त्यावरून लवकरच ही कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नूतन इमारतीच्याया कामा कडे लक्ष देऊन काम चांगल्या प्रतीचे आणि लवकरात लवकर पूर्ण होण्या करीता लक्ष घातले होते.सध्या या नूतन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून अंतर्गत आणि बाह्य काम सुरू आहे. तसेच इमारतीबाहेरील रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून लवकरच या नवीन वस्तू जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित होईल एकाच वस्तूमध्ये सर्व विभागांचे कार्यालय असल्यामुळे नागरिकांना इतरत्र हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version