Home जिल्हा तुमने पुकारा और हम चले आये..तीच बोलावणं पडलं लाखो रुपयांना अहमदनगर जिल्ह्यात...

तुमने पुकारा और हम चले आये..तीच बोलावणं पडलं लाखो रुपयांना अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा ट्रॅप

श्रीगोंदा दि.२५ फेब्रुवारी
श्रीगोंदा शहरात एक ट्रॅप झाला असून या ट्रॅप मधून एका सरकारी अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा चुना लावल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सोशल मीडियावर झालेली मैत्री किती महागात जाऊ शकते ते या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नकळत ओळख मग भेटी गाठी आणि नको ते केल्यानंतर त्या गोष्टीचे आलेले फोटो पाहून त्या अधिकाऱ्याच्या पाया खालची वाळू सरकली प्रकरण मिटवायला काही लोकांनी मध्यस्थी केली हे प्रकरण मिटवायला त्या अधिकाऱ्याला लाखो रुपयांचा मलिदा मध्यस्थांमार्फत त्या महिलेला द्यावा लागला.

मात्र झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत त्या अधिकाऱ्यांने झंजट मिटली म्हणून मोकळा श्वास घेतला खरा मात्र याची चर्चा संपूर्ण शहरात झाल्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार या अधिकाऱ्याला करावा लागतोय.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे काही दिवसांपूर्वी असेच एका अधिकाऱ्याला ट्रॅप मध्ये लुटण्याची घटना घडली होती मात्र त्या अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेऊन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता .

त्याच प्रकारे या अधिकाऱ्याने सुद्धा पोलिसांकडे जाऊन ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा आणि ब्लॅक मेल करणाऱ्या लोकांचा चेहरा जगासमोर आणावा अशी चर्चा दबक्या आवाजात श्रीगोंदा शहरात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version