Home शहर नगरचा उड्डाणपूल हा नगरचे चित्र बदलणारा झाडांच्या आकाराच्या पिलरसह लाईट इफेक्ट्स आणि...

नगरचा उड्डाणपूल हा नगरचे चित्र बदलणारा झाडांच्या आकाराच्या पिलरसह लाईट इफेक्ट्स आणि शिवचरित्र पिलरवर रंगवणार – खा. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांची माहिती

अहमदनगर दि.२६ मार्च
अहमदनगर शहरातील उड्डाण पूल नागरिकांसाठी दिवाळी पर्यंत खुला करण्याचा प्रयत्न असून त्या दृष्टीने काम सुरू असून उड्डाणपुलांचे पिलर वर खासदार आणि आमदार निधी मधून 32 पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपनापासून ते त्यांच्या राज्याभिषेक पर्यंत शिवचरित्र या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून रेखाटणार आहेत अशी माहिती भाजपचे खा. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे .
नगरचा उड्डाणपुलाचा शुभारंभ पक्ष विरहीत करण्याचा मानस खा.सुजय विखे यांनी बोलून दाखवला असून हा सर्वसामान्य नागरकरांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे नियोजन असल्याचं आ. संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे.या सर्व प्रकल्पाला एक ते सव्वा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

याच बरोबर चार चौकांमध्ये पिलरवर झाडांच्या प्रतिकृती करून चौक सुशोभित करण्यात येणार आहे या साठी आमदार आणि खासदार निधीतून खर्च करण्यात येणार आहे.

तसेच बजाज कंपनीच्या माध्यमातून आकर्षक लाईट उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूने लावण्यासाठी बोलणी सुरू असून प्रत्येक सण, जयंती, स्वतंत्रदिन, या दिवशी वेगवेगळ्या प्रकरच्या लाईट इफेक्ट्स नागरकरांना पाहायला मिळणार आहे.

नगरचा उड्डाणपूल हा शहरातील आगळा वेगळा पूल होणार असून वाहेर गावातील नागरिक खास उड्डाणपूल पाहायला येतील असा उड्डाणपूल बनवण्याचे दृष्टीने काम सुरू असल्याचे खा.विखे आणि आ. जगताप यांनी सांगितलंय.

तर सक्कर चौक आणि एसबीआय चुकत एमपी थिएटर करण्यात येणार असून त्या ठिकाणी नागरिकांसाठी बसण्याची जाग करण्यात येणार आहे.

उड्डाणपूलाच्या कोणत्याही पिलरवर राजकीय जाहिरात बोर्ड, चिन्ह, अथवा कोणतीही खाजगी जाहिरात लावण्यात येणार नाही या बाबत प्रयोजन करण्यात येणार आहे.

उड्डाणपूल हा नागरकरांच्या जिव्हाळ्याचा असून त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे हा पूल नागरकरांसह बाहेर गावावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाचा थांबा होईल असा विश्वास खा.सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version