Home जिल्हा नगर औरंगबाद रोडवर गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची...

नगर औरंगबाद रोडवर गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता पोलिसांनी दिलेल्या नोटिसीला कंपनी दाखवली केराची टोपली

अहमदनगर दि १८ फेब्रुवारी
नगर औरंगाबाद रोडवर सध्या कल्पतरु पावर ट्रान्समिशन लिमीटेड ऑईल अॅण्ड गॅस डिव्हीजन या खासगी कंपनीमार्फत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र ही पाईपलाईन टाकत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रोडवर अपघात वाढले आहेत तसेच भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे.

रस्त्याच्या कडेलाच मातीचे ढिगारे टाकल्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना या रोड वरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते तसेच काही ठिकाणी अचानकपणे रस्ता बंद करून काम सुरू असते याबाबत संबंधित विभागाला अथवा पोलिसांना कळवले जात नसल्याने अनेक वेळा या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याच्या घटना घडत आहेत.

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी संबंधित कंपनीला
क्रिमीनल प्रोशिजर कोड कलम 149 प्रमाणे नोटीस देऊन सुद्धा या नोटिशीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.

भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास पुन्हा एकदा पोलिसांच्या नावाने ओरड होत असते मात्र संबंधित कंपनी एवढी मुजोर आहे ते त्यांनी पोलिसांनी दिलेल्या नोटिशीला साधे उत्तरही दिलेले नाही.

गॅस पाईप लाईन टाकताना एमआयडीसी पोलीस स्टेशनला कोणती माहिती देण्यात आलेली नसून अनेक वेळा कामकाज करताना मोठमोठे लोखंडी पाइप हे रोडवर अस्ताव्यस्त पडलेले असतात त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

रोडच्या कडेला माती टाकल्यानंतर त्या मातीच्या अवतीभवती संरक्षक कठडे लावणे महत्त्वाचे आहे मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले जातेय त्यामुळे रात्रीच्या वेळेस या मातीच्या मोठं मोठ्या ढिगाऱ्यांमुळे मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत जेऊर, इमामपूर  येथील नागरिकांनी तसेच पोलिसांनी नोटीस देऊनही ठेकेदार आपले काम सुधारायला तयार नसल्याने या मुजोरा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी जेऊर आणि इमामपूरच्या नागरिकांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version