Home जिल्हा नगर शहरातील नाल्यातून वाहतायेत रक्ताचे पाट,

नगर शहरातील नाल्यातून वाहतायेत रक्ताचे पाट,

अहमदनगर प्रतिनिधी-
अहमदनगर शहरा मध्ये अवैद्य कत्तलखाने बंद असल्याचं दिसत असलं तरी चोरीछुपे हे कत्तलखाने सुरूच आहेत. याचा पुरावा म्हणजे सध्या नगर शहरात नाल्यांमधून रक्ताचे पाट वाहत आहेत. तेच या अवैध कत्तलखान्यांचा मोठा पुरावा समोर आला आहे. सध्या नगर शहरातुन जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अनेक वेळा महानगरपालिकेच्या बंद पाईप नाल्या उघड्या पडत आहेत.नगर पुणे मार्गावरील अहमदनगर कॉलेज समोरील एका ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम चालू असताना महानगरपालिकेची नाला फुटला आणि त्यामधून अक्षरशा रक्ताचा पाट वाहताना दिसला. म्हणाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भागात न या ठिकाणी येत असल्याचं निदर्शनास आलं मंगे लाल रंगाचे पाणी नेमकं येते कुठून आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी सोडतोय कोण यामध्ये चोरी छुपे अवैध कत्तलखाने सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.यामुळे नाल्याच्या शेजारून जाणाऱ्या पाण्याच्या पाईप मध्ये जर हे रक्तमिश्रित पाणी गेले तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या भागात सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे घरे आहेत. या नाल्याच्या शेजारूनच पाण्याचे पाईप गेलेले आहेत. या नाल्यामधून पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला भेटते याबाबत मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सोशल मीडियावर या नाल्याचे व्हिडिओ टाकून महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने या कत्तलखान्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. एकीकडे कत्तलखाने बंद असल्याचे दाखवत चोरीछुपे कत्तलखाने सुरू असल्याचं समोर येत आहे. हे कत्तलखाने कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version