अहमदनगर दि २२ मार्च
रविवारी नगर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन इसमांनी आळीपाळीने अत्याचार केला आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती याबाबत कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील अल्पवयीन पिडीतेच्या भावाचे आणि तिच्या घराशेजारी राहणारे सिल्वर चव्हाण याचा मुलगा अनिल या दोघांचे दारू पिण्यावरून भांडणे झाली होती. त्यावरून आरोपी अनिल चव्हाण याने पिडीतेच्या आईला दगडाने मारहाण केली होती. पिडीतेची आई मारहाणीत गंभीर जखमी झाली असल्याने तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी घरी आल्यानंतर तिने आईसाठी जेवण करून आईला दवाखान्यात जाऊन डब्बा पोहोचला होता त्यानंतर या अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी घरी सोडले होते रात्रीच्या सुमारास ही मुलगी घरात झोपलेली असताना सिल्वर चव्हाण, वरगा चव्हाण सुनील चव्हाण आणि अनिल चव्हाण अल्पवयीन मुलीच्या घरात घुसले आणि यातील सिल्वर चव्हाण आणि त्याची बायको वरगा चव्हाण यांनी अल्पवयीन मुलीचे हात धरले आणि सुनील आणि अनिल चव्हाण यांनी त्या मुलीवर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
अल्पवयीन मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आजी त्याठिकाणी आली असता आरोपी तिथून पळून गेले अल्पवयीन मुलीवर सध्या दवाखान्यात उपचार सुरू असून तिच्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.