अहमदनगर दिनांक 22 मार्च
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 21 मार्च रोजी तिथीप्रमाणे उत्साहात साजरी झाली नगर शहरातील अनेक चौकाचौकांमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या पोवाडे आणि जय शिवाजी जय भवानी च्या घोषणांनी संपूर्ण नगर शहर दणाणून सोडले होते भगव्या झेंड्यांनी संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून शिवजयंती मिरवणूकीची सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये आकर्षण ठरले ते शिवसेनेचे संगमनेर येथील वन्स मोअर बँजो पार्टी तसेच जालना अंबड येथून आलेले बँड पथक तर भारतीय जनता पार्टीने बुऱ्हानगर येथील हलगी वादकांच्य ठेक्यावर मान्यवरांनी ठेका धरला होता तसेच साताऱ्याच्या हलगी वादकांनी हलगी वाजवून निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने सामील झालेल्या घोड्यांना ठेका धरायला लावून नगरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
या मिरवणुकीत पारंपारिक ढोल ताशा आणि हलगी बँड पथकासह डीजे ही चांगलाच दणकत होता डीजेच्या तालावर तरुणांनी ताल धरून चांगला झिंगाट डान्स केल्याचं दृश्य शहरात पाहायला मिळालं मात्र शिवसेनेने या मिरवणुकीत दोन बँड पथक तसेच बँजो पथक आणि हलगी वादक आणि नाचणाऱ्या घोड्यांचा समावेश केल्याने ही मिरवणूक थोडेफार का होईना पारंपरिक पद्धतीने साजरी केली याबाबत नागरकरांनी समाधान व्यक्त केले.
रात्री बरोबर बाराच्या ठोक्याला चितळे रोडवर मिरवणुकीची समाप्ती झाली जवळपास सर्वच मंडळे चितळे रोडवर आले असताना ही मिरवणूक संपली कोणताही वादविवाद न होता शांततेत ही निवडणूक पार पडली असून पोलिसांनी ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला होता शहर उपअधीक्षक अनिल कातकडे तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे हे या मिरवणूक वर लक्ष ठेवून होते.