Home जिल्हा नेवासा येथे कुस्त्यांच्या हंगाम्यात असंख्य मल्लांचा सहभाग, छोट्या मोठया मल्लांकडून उत्कृष्ट पकडीचे...

नेवासा येथे कुस्त्यांच्या हंगाम्यात असंख्य मल्लांचा सहभाग, छोट्या मोठया मल्लांकडून उत्कृष्ट पकडीचे प्रदर्शन,कुस्ती स्पर्धा वाढवण्या साठी पाठबळ देऊ-उदयन गडाख

नेवासा -दि २४ फेब्रुवारी प्रतिनिधी आदित्य सुकाळकर

नेवासा येथील श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या सांगता प्रसंगी कुस्त्यांच्या हंगाम्याने मोठी रंगत आणली.छोट्या पासून मोठया मल्लांनी या हंगाम्यात सहभाग नोंदवला. सर्व मल्लांनी यावेळी उत्कृष्ट पकडीचे प्रदर्शन घडवले. कुस्त्यांच्या हंगाम्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य मल्ल सहभागी होते.

नेवासा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कुस्त्यांच्या या जंगी हंगाम्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. बालकांसह मुलींच्या कुस्त्या ही या हंगाम्याचे आकर्षण ठरले होते. कुस्त्यांच्या खेळाला बळकटी येण्यासाठी व मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी योगदान व पाठबळ देऊ अशी ग्वाही युवा नेते उदयनदादा गडाख यांनी यावेळी बोलतांना दिली.

या कुस्त्यांच्या हंगाम्यासाठी नामदार शंकरराव गडाख यांनी एकतीस हजार रुपयांची मदत बक्षिसांच्या रूपाने दिली.

नेवासा तालुक्याचे युवा नेते उदयनदादा गडाख यांच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला. प्रावीण्य मिळवलेल्या गुणी मल्लांचे उदयनदादा गडाख यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. तर या हंगाम्यात प्रथम शालेय शिक्षण घेत असलेल्या विसीच्यावर युवती मल्लांनी सहभाग नोंदवला या सर्व युवती मल्लांचेराष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकर हिच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी झालेल्या कुस्त्यांच्या हंगाम्याच्या प्रसंगी यात्रा कमिटीचे सदस्य नगराध्यक्ष सतीश पिंपळे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक राजेंद्र मापारी, महेश मापारी, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे, प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, जालिंदर गवळी, अभिजित मापारी, आकाश एरंडे, दीपक धोत्रे, अंबादास लष्करे, पत्रकार सौरभ मुनोत, अभिषेक गाडेकर, अजित नरुला, शिक्षक राहुल आठरे, नगरसेवक सचिन वडागळे, इम्रान दारुवाले, सुलेमान मणियार उपस्थित होते

यावेळी यश संपादन केलेल्या मल्लांचे यात्रा कमिटीच्या वतीने पारितोषिके देऊन स्वागत करण्यात आले. कुस्त्यांच्या हंगाम्याच्या प्रसंगी पंच म्हणून क्रीडा शिक्षक संभाजी निकाळजे, मास्टर सुरेश लव्हाटे, क्रीडा शिक्षक सुनील शिंदे यांनी काम पाहिले.तर पो.हे.कॉ. तुळशीराम गीते, कोळसे दादा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version