Home Uncategorized सावेडीचा तलाठी कोण नागरीकांना पडलाय प्रश्न खाजगी इसम हलवतोय तलाठी कार्यालयाची सूत्रे

सावेडीचा तलाठी कोण नागरीकांना पडलाय प्रश्न खाजगी इसम हलवतोय तलाठी कार्यालयाची सूत्रे

अहमदनगर दि २३ फेब्रुवारी
सावेडी तलाठी कार्यालयातील तालाठ्यासाह नागापूरचे तलाठी संदीप तरटे मंडलाधिकारी जगन्नाथ धसाळ,यांच्यासह.मवाळ इन्फास्ट्रक्चरचे भागीदार अशोक मवाळ, पंकज मवाळ,भरत मवाळ व मृदुल मवाळ यांनी मालमत्तेवर कर्जाचा बोजा शिल्लक असताना खोटे कागतपत्र शिक्के तयार करून बँकेची फसवणूक केल्या बद्दल तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र तरीही सावेडी तलाठी कार्यालयाचा कारभार सुधारलेला नाही.

या कार्यालयातच वराडे नामक खाजगी इसम काम करत असून सेवा आणि मेवा करण्याचं काम सुरू आहे सावेडी तलाठी कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना सेवा आणि मेवा मागणी करत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही मेवाची मागणी कोणाच्या सांगण्यावरून होत आहे आणि वराडेच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.तलाठी कार्यालयाची सर्व सूत्रे वराडे हा अनधिकृतरित्या कशी हलवतो त्याला हे अधिकार
कुणाच्या संमतीने देण्यात आले हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वारस नोंदणी असो किंवा नाव नोंदवयाचे असेल तरीतलाठी कार्यालयात हाच काम घेऊन येणाऱ्यांशी बोलणी करतो. तलाठी कार्यालयात बसून राजरोसपणे मेवा गोळा करण्याच काम करत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे अनधिकृतपणे तलाठी कार्यालयात बसून मेवागिरी गोळा करणाऱ्या या व्यक्तीवर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वराडे नावाचा खाजगी ईसम थेट तलाठ्याच्या शेजारीच खुर्ची टाकुन बसत असल्याने तो खाजगी ईसम आहे का सरकारी कर्मचारी आहे याबाबत नागरिकांना समजत नसल्याने आणि सर्व कामे तोच पाहत असल्याने अनेक वेळा नागरिकांची फासगत होते याबाबतचा पुरावा काही नागरिकांनी आमच्याकडे दिला आहे हा पुरावाच सगळं काही बोलतो आहे

 

वराडे नावाचा खाजगी इसम सावेडी तलाठी कार्यालयात कामास आहे मात्र तो फक्त दाखले देण्यापुरता काम करतो तो सरकारी कर्मचारी नाही.”
सागर भापकर
तलाठी सावेडी

नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार या खाजगी इसमा बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version