Home जिल्हा पंजाबी लस्सी सह पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा शुद्ध शाकाहारी हॉटेल अपना...

पंजाबी लस्सी सह पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा शुद्ध शाकाहारी हॉटेल अपना पंजाबला भेट द्याचं

अहमदनगर दि.१८ फेब्रुवारी
सध्याच्या काळात हॉटेलिंग व्यवसायात उत्कृष्ट स्वादाच्या जोडीला सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य व आधुनिकता वाढत आहे.

नगर मधील तारकपूर परिसरामध्ये पंजाबी तडका या नॉनव्हेज हॉटेलच्या रुपाने आपले नाव कमवणाऱ्या जितू आणि चरणजितसिंग गंभीर परिवाराने आता संपूर्ण शुद्ध शाकाहारी हॉटेल अपना पंजाब रुपाने आपल्या व्यवसायाचा नवा आविष्कार साकारला आहे.

गंगा उद्यान शेजारी असलेल्या परगावकर हॉस्पिटल समोर १३ फेब्रुवारी पासून हे शुध्द शाकाहारी फॅमिली हॉटेल अपना पंजाब नागरकरांच्या सेवेत दाखल झाले असून विधान परिषदेचे आमदार अरूण काका जगताप यांच्या शुभहस्ते या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला.

पंजाबी तडका या हॉटेल मधून आदरातिथ्याची सेवा हॉटेल अपना पंजाबच्या रुपाने आणखी विस्तारीत करण्यात आली आहे.या हॉटेल मध्ये प्रवेश केल्यावर ग्राहकाला पंजाब मध्ये गेल्याच भास होईल असे वातावरण करण्यात आले आहे पंजाबच्या हॉटेल इंडस्ट्रीचा अभ्यास करून नगरकरांना अतिशय आनंददायी वातावरणात हॉटेलिंगचा परिपूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अतिशय आरामदायी भारतीय बैठक व्यवस्था असलेले टेरेस,टेबल खुर्च्या पासून सोफासेट ,पंजाबी बाज, आशा विविध बसण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत त्याच बरोबर या वास्तूतून आपुलकीची स्वाद सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नामांकित इन्स्टीट्युटमध्ये प्रशिक्षण घेतलेला स्टाफ येथे सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे. हॉटेल अपना पंजाब मध्ये नावाप्रमाणेच पंजाबी मेन्यूही उपलब्ध आहे. अनुभवी शेफच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले स्वादिष्ट पदार्थांची मोठी रेलचेल मेन्यूत आहे.

यात पंजाबी लस्सी पासून ते सर्व पंजाबी डिशेस तसेच साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन मेन्यूसह देश विदेशातील नावाजलेल्या मेन्यूचा समावेश आहे. अतिशय स्वादीष्ट व लज्जतदार चवीतून ग्राहकांची पोटपूजा मनस्वी आनंद देणारी ठरेल, याची काळजी हॉटेल अपना पंजाबने घेतली आहे. कोणत्याही हॉटेलसाठी तेथील पदार्थांची गुणवत्ता व स्वाद अतिशय महत्त्वाचा असतो.

त्यामुळे जेवायला येणारा प्रत्येक ग्राहक मनानेही तृप्त होवूनच परतेल व पुन्हा पुन्हा येईल, अशीच स्वादिष्ट सेवा याठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासह, मित्र परिवारासह अतिशय प्रसन्न वातावरणात आनंददायी भोजनाचा आस्वाद सर्वांना घेता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version