Home जिल्हा पाथर्डीच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र...

पाथर्डीच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे सूतोवाच

अहमदनगर दि १ मार्च
पाथर्डी चा राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप होणार असून लवकरच आपल्याला समजेल असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला आहे. आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली नगरमधील राष्ट्रवादी भवन मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.

नगरपालिका निवडणूकी बाबत या बैठकीत विचारमंथन करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात 10 नगरपालिकांच्या निवडणुका होत असून या निवडणुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या का स्वबळावर याबाबत स्थानिक नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्या तीन पैकी दोन नगरपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या असून एक भाजपच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे आगामी नगर पालिका निवडणुकांमध्ये आम्ही यश मिळवू असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला आहे.

तसेच पाथर्डी मध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असून वाट पहा वेळ आली की तो दिसेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केल आहे. त्यांचा इशारा भाजपचा एका नेत्याकडे असून तो नेता लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची चर्चा सध्या पाथर्डी मध्ये जोरदार सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version