अहमदनगर दि.२६ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा थैमान सुरू केल आहे करंजी येथील एका शाळेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती.यानंतर दोन दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालय येथे १९ विद्यार्थी कोरोना बाधित निघाल्यानंतर ४२८ विद्यार्थ्यांसह शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात 428 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. ४२८ पैकी 33 जण कोरोना बाधीत असल्याचं वृत्त हाती येत आहे. एकीकडे कोरोनाचे आकडे घटत असल्याचं दिसत असतानाच शालेय विद्यार्थ्यांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या सर्व कोरोना बाधित रुग्णांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.