Home जिल्हा पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर राळेगणसिद्धी मध्ये दाखल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली...

पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर राळेगणसिद्धी मध्ये दाखल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली भेट

राळेगणसिद्धी – दि १३ फेब्रुवारी
वाईन शॉपप्रमाणेच, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातही वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. या निर्णयाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याप्रकरणात उडी घेतली आहे.

१४ फेब्रुवारीपासून या निर्णयाविरुद्ध आपण उपोषणास बसणार आहेत अण्णा हजारे यांनी आपले वय पाहता उपोषण करण्यापेक्षा मौन धारण करावे अशी विनंती अनेक स्वयंसेवी संस्थांनी अण्णा हजारे यांना केली आहे

मात्र अण्णा आपल्या निर्णय ठाम असून शनिवारी याच पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पोलिस महानिरिक्षक बी.जी.शेखर यांनी राळेगणसिद्धी येथे आण्णा हजारे यांची भेट घेतली.यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील पूणे विभागाचे ऊत्पादन शुल्क विभागीय अधिकारी प्रसाद सुर्वे हे उपस्थित होते. रविवार पासून अण्णा हजारे उपोषण याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच राळेगण-सिद्धी परिसराची पाहणी ब्रिटिशकालीन यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version