Home शहर बाजारपेठेतील हातगाडीवाले, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात विविध संघटना राजकीय पक्ष एकवटल्या अहमदनगर व्यापारी महासंघाच्या...

बाजारपेठेतील हातगाडीवाले, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात विविध संघटना राजकीय पक्ष एकवटल्या अहमदनगर व्यापारी महासंघाच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

अहमदनगर दि.२८ मार्च

: शहरातील कापडबाजारासह संपूर्ण बाजारपेठेत अवैधरित्या रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांचा कायमचा बंदोबस्त करून बाजारपेठेचा श्वास मोकळा करण्याची मागणी अहमदनगर व्यापारी महासंघाने केली आहे. बाजारपेठेत पुन्हा एकदा हातगाडीवाले पथारी मांडून बसू लागले आहेत. त्यामुळे कडक कारवाईसाठी व्यापारी महासंघाने मंगळवार दि.२९ मार्च पासून कापडबाजारात बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

महासंघाच्या या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा पत्र दिल्याची माहिती अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी दिली.

हिंदू राष्ट्र सेनेने बाजारपेठेतील व्यापार्‍यांची मागणी योग्य असल्याचे सांगत मनपा आयुक्तांना बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी निवेदन दिले. यानंतर हिंदू राष्ट्र सेनेने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनाही पाठिंबा पत्र दिले आहे. यावेळी घनश्याम बोडखे, परेश खराडे, सागर ठोंबरे, महेश निकम आदी उपस्थित होते.

दि अहमदनगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशननेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी पाठिंबा पत्र दिले आहे. याशिवाय अहमदनगर जिल्हा हॉटेल असोसिएशन, ऑटोमोबाईल असोसिएशन, शहर सराफ सुवर्णकार संघटना, बिल्डिंग मटेरियल असोसिएशन, पैलवान प्रतिष्ठान, तोफखाना मित्र मंडळ, वर्चस्व ग्रुप, अहमदनगर जिल्हा व शहर ड्रग्स ऍण्ड केमिस्ट असोसिएशन, पंजाबी सेवा समिती, जय आनंद महावीर युवक मंडळ, अहमदनगर रिटेल फूटवेअर मर्चंट असोसिएशन, अहमदनगर मिठाई होलसेल व रिटेल असोसिएशन, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, बजरंग दल, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, महापद्म सेना पद्मशाली समाज, जिव्हेश्वर युवा मंच सकुन साळी समाज, एम.जी.रोड व्यापारी असोसिएशन, सकल राजस्थानी युवा मंच ट्रस्ट, जैन ओसवाल युवक संघ, जिनगर समाज यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भटके-विमुक्त आघाडी – भारतीय जनता पार्टीसह अन्य राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असल्याचे ईश्वर बोरा यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version