Home राजकारण बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या स्थलांतरास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचाच विरोध, शिवसेनेच्या “या” नेत्यांने दिले आयुक्तांना...

बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या स्थलांतरास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचाच विरोध, शिवसेनेच्या “या” नेत्यांने दिले आयुक्तांना तसे पत्र

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या स्थलांतरावरून आता वादंग निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी या स्थलांतरास विरोध दर्शवला असून हे रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती परिसरात असल्याने शहरासह सावेडी केडगाव ,कल्याण रोड स्टेशन रोड अशा सर्व प्रकारच्या उपनगर परिसरातील नागरिकांना याच्या माध्यमातून सोयीस्कर पद्धतीने सेवा मिळत आहे तसेच शहरा बाहेरून येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांना माळीवाडा बस स्थानकापासून हे रुग्णालय अत्यंत कमी अंतरावर असल्यामुळे त्यांनाही हे मध्यवर्ती भागात असलेले रुग्णालय सोयीचे असून महानगरपालिकेकडून याआधीही रुग्णालयाच्या नूतनीकरणा बाबत व नवीन इमारती बाबत निर्णय झालेले आहेत महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी तो रद्द केला असल्याचा आरोपही संभाजी कदम यांनी लावला आहे. आता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी आता आणि निधी उपलब्ध झालेला आहे .रुग्णालयाची सध्याची जागा मोठी असून ती जुनी वापरात नसलेली इमारत पाडून प्रशस्त रुग्णालय होऊ शकते त्यामुळे रुग्णाच्या स्थलांतराची कुठलीही गरज भासणार नाही. असही संभाजी कदम यांनी स्पष्ट केल आहे. सावेडी उपनगर परिसरात मोठी लोकवस्ती असून या भागात रुग्णालय भरण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे .याबाबत महासभेत ठराव झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी असेही संभाजी कदम यांनी स्पष्ट केला आहे. तसेच उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी देशपांडे रुग्णालयाच्या स्थलांतराचे दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version