Home क्राईम बिट मार्शल साठी अहमदनगर पोलीस दलात येणार ‘ही’ पॉवरफुल गाडी

बिट मार्शल साठी अहमदनगर पोलीस दलात येणार ‘ही’ पॉवरफुल गाडी

अहमदनगर – दि.१५ डिसेंबर
अहमदनगर जिल्हा पोलिस दलात बीट मार्शल साठी आता नवीन गाड्या येणार असून टिव्हीस आपची या दुचाकी पोलीस दलात येणार आहेत. सध्या अहमदनगर शहरात बिट मार्शल किरत नसल्याने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच काही दिवसांपासून मंगळसूत्र चोऱ्यांचे सत्र ही सुरू झाले असून. बीट मार्शल शहरात फिरत असेल तर याचा थोडा धाक अशा चोरट्यांना बसत असल्याने बीट मार्शलच्या फेऱ्या शहरात चालू कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून शहरात बिट मार्शल साठी सायरन असलेल्या आणि पोलिसांना उपयोगी पडतील आशा सोयींनीयुक्त आशा दुचाकी बनवण्यात आल्या होत्या.मात्र बिट मार्शल साठी ज्या गाड्या देण्यात आल्या होत्या त्या सध्या जुन्या झाल्याने नादुरुस्त आहेत .आता पोलिस दलाला नवीन गाड्या मिळणार असून लवकरच बिट मार्शल पुन्हा शहरात फिरताना दिसून येतील. मंगळसूत्र चोरांकडे अत्याधुनिक पद्धतीच्या गाड्या असल्याने धूम स्टाईलने चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनाही कधी कधी त्यांचा पाठलाग करताना अडचण होते त्यामुळे आता बीट मार्शल साठी टीव्हीएस आपाची या पावरफूल गाड्या पोलीस दलात येणार आहेत. चोरट्यांना पकडणे पोलिसांना शक्य होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version