Home क्राईम भर दिवसा घरात प्रवेश करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या...

भर दिवसा घरात प्रवेश करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पारनेर – दि.२३ डिसेंबर
पारनेर येथील महिलेच्या घरात प्रवेश करून धारदार हत्याराने जखमी करुन गळ्यातील मंगळसुत्र व डोरले चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.९ डिसेंबर रोजी बबई विठ्ठल हिंगडे या घरात एकट्या असताना आरोपी याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला.घरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन याने यांना उचलुन बाथरुममध्ये कोंडुन,धारदार हत्याराने जखमी करुन गळ्यातील ५२,०००/- हजर रुपये किंमतीचे २५ ग्रॉम वजनाचे मंगळसुत्र बळजबरीने चोरुन नेले होते.या घटनेबाबत यांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना केल्या नंतर चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या.हा गुन्हा हा विजय मोहिते आणि त्याच्या साथीदारांनी मिळुन केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पीएसआय सोपान गोरे, सहह्याक फौजदार राजेंद्र वाघ, सहह्याक फौजदार संजय खंडागळे, पोहेकॉ बापु फोलाने, पोना भिमराज खर्से, देवेंद्र शेलार व चालक पोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळुन दरोडी येथे जाऊन विजय जगन्नाथ मोहिते यास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार मनोज रमेश पवार यांनी मिळुन केला असल्याची माहिती दिल्याने त्याच्या माहितीच्या आधारे दुसरा आरोपी मनोज रमेश पवार याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सोन्याचे मंगळसुत्र व डोरले व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण १,३५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version