अहमदनगर दि.१३ एप्रिल
अहमदनगर जिल्हयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती,बैसाखी व इतर सण उत्सव एका मागे एक आल्याने पोलीस प्रशासनावर याचा मोठा ताण पडणार आहे या सण उत्सव काळात जिल्ह्यात मोठा पोलीस सुथोबंदोबस्त देण्यात आला असून अहमदनगर जिल्हयात २४९ ठिकाणी प्रतिमा पुजन, ५३ ठिकाणी पुतळा पुजन व २४३ टिकाणी मिरवणुका इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यासाठी लावण्यात आलेला बंदोबस्त पाहुयात
अपर पोलीस अधीक्षक 2
पोलीस उपअधीक्षक ७
पोलीस निरीक्षक २९
सपोनि /पो स ई ७०
पोलीस अंमलदार १२५०
आर.सी.पी ३
होमगार्ड ४००
स्ट्रायकिंग फोर्स २
क्यु.आर.टी २
जिल्हयात विशेषत: अहमदनगर शहर, श्रीरामपुर शहर, संगमनेर शहर, नेवासा राहुरी, जामखेड, नगर सुथो
तालुका या संवेदनशिल तालुक्यांमध्ये अधिकचा पोलीस दल व राज्य राखीव पोलीस सुथोदल यांचा बंदोबत नेमण्यातआलेला आहे. नेवासा येथे श्रीरामनवमी मिरवणुकी दरम्यान झालेल्या घटणेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला असुन काही आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.सुथोव घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सखोल व बारकाईनेतपास करुन तपासा दरम्यान निष्पन्न झालेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करत असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , महावीर जयंती व बैसाखी सण/उत्सव अनुपंगाने समाजातील सर्व घटकांनी शांततेने पार पाडावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केलेले आहे.
तसेच सण उत्सव दरम्यान सोशल मिडीयावर (समाज माध्यम) आक्षेपार्ह पोस्ट किंवा मेसेज प्रसारीत केल्यास तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विघातक बातम्या पसरवणाऱ्यांवर सायबर पोलीस स्टेशनचे अहमदनगर जिल्हयातील उत्तर व दक्षीण विभागा सुथोकरीता दोन पथके विशेष लक्ष ठेऊन आहे. सोशल मिडीयावर (समाज माध्यम) अफवा पसरवीणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलाय.
तसेच सण उत्सवा दरम्यान अफवा पसरवीणान्यां विषयी काही माहीती मिळाल्यास सायबर पोलीस स्टेशन व
नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे संपर्क करावा.
१) नियंत्रण कक्ष अहमदनगर -०२४१-२४१६१३२, ०२४१-२४१६१३८ व ११२
२) सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर – ०२४१-२३२३१२१