अहमदनगर दि.१३ जानेवारी
१४ जानेवारी अर्थात मकर संक्रांतीचा दिवस या दिवशी पतंग उत्सवा बरोबरच महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो या दिवशी महिला सकाळीच मंदिरामध्ये जाऊन ववसा करून एकमेकांची ओटी ही भरत असतात. या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत पतंग उडवण्याचा आनंद सर्वजण घेत असतात.
दुपारी चार नंतर अनेक व्यवसायिक आपली दुकाने बंद करून पतंग उडवण्याचा आनंद लुटण्यासाठी गच्चीवर गेल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते.पतंग उडवण्या बरोबरच साऊंड सिस्टिम वर गाणे लावून त्याच्या तालावर पतंग उडवत धमालमस्ती करत अनेक तरुण या मकर संक्रांतीचा आनंद घेताना दिसतात.
मात्र सध्या कोरोनाची भयंकर परिस्थिती असून पुन्हा एकदा तिसऱ्या लाटे कडे प्रवास सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी सायंकाळी सहानंतर आपल्या साऊंड सिस्टिम वर हनुमान चालीसा लावून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करूया असे आवाहन युवासेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले आहे.
चित्रपटातील गाणे लावण्या पेक्षा धार्मिक गाणे लावल्याने भक्तीमय होण्यास मदत होईल त्यामुळे सर्वांनी सायंकाळी सहा नंतर आपापल्या साउंड सिस्टीम वर हनुमान चालीसा लावावी आणि पतंगबाजी साठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवहान युवा सेनेतर्फे करण्यात आले आहे.