Home Uncategorized मनसे च्या कार्यालयात राडा व्हिडीओ व्हायरल

मनसे च्या कार्यालयात राडा व्हिडीओ व्हायरल

पुणे दि. १९ मे

पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात ही झटापट झाली. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाहीत, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर त्यांच्याच झटापट झाली.

मात्र, आमच्यातील वैयक्तिक कारणामुळे किरकोळ बाचाबाची झाल्याचे शिरोळे यांचे म्हणणे आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यांची पुण्यात सभाही होणार होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे निघताच आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.पहा व्हिडीओ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version