अहमदनगर दि.११ फेब्रुवारी
महापालिकेतील महिलांची छेडछाड शारीरिक सुखाची मागणी करणारा अश्लील चाळे करण्याचे आरोप तत्कालीन अस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्यावर आरोप झाल्या नंतर सुद्धा त्यांच्यावर फक्त बदलीची कारवाई करण्यात आली होती तर आता सिद्धी बाग येथील उद्यानातून सौर उर्जेवर चालणारे विद्युत पोल चोरी करण्याच्या उद्देशाने कापून विकण्याच्या प्रयत्नात असताना लहारे याच्या साथीदारांना काही मनपा कर्मचार्यांनी रंगेहात पकडले होते .
त्याबाबत सर्व पुरावे फोटो कॉल रेकॉर्डिंग आयुक्त उपायुक्त यांना पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते आणि शिवसेनेच्या आंदोलना नंतर मेहेर लहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती
. मात्र अत्यंत गंभीर चूक झालेली असतानाही आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची गरज असताना राजकीय पाठिंबा आणि महापालिकेतील अधिकारी यांचा पाठिंबा याच्या जोरावर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन मेहेर लहारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
यावर पुढील आठ दिवसात गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड माजी महापौर अभिषेक कळमकर , नगरसेवक बाळासाहेब बोराटे,दत्ता जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.