Home विशेष महापालिकेच्या घंटागाड्या धावतेयत विना परवाना,

महापालिकेच्या घंटागाड्या धावतेयत विना परवाना,

अहमदनगर प्रतिनधी

अहमदनगर महानगर पालिकेच्या वतीने सध्या नगर शहरात  खासगी ठेकेदारामार्फत कचरा संकलन केले जाते महानगरपालिकेच्या वतीने  64 घंटागाड्या ठेकेदाराला कचरा संकलनासाठी देण्यात आल्या आहेत या घंटागाड्या रोज सकाळी विविध प्रभागांमध्ये जाऊन कचरा संकलन करत असताना गाड्यांवर स्पीकर लावून कचरा घंटागाडी टाकण्याबाबत प्रबोधन केले जाते. तसेच महानगरपालिकेच्या विविध सूचनांचे पालन करण्यासाठी आवहान केले जाते. मात्र या गाड्यांवर जे स्पीकर लावले आहेत ते अनधिकृत असून पोलिसांनकडून  याबाबत कोणतीही  परवानगी घेतलेली नाही. 2020 पासून या गाड्या कचरा संकलन करत आहेत मात्र महानगरपालिके कडून अथवा ठेकेदाराकडून पोलिसांकडे कोणताही रीतसर अर्ज स्पीकर परवानगीसाठी गेलेला नव्हता.

याबाबत केडगाव येथील मिलिंद कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर महानगरपालिका आणि ठेकेदाराला जाग आली असून आता कुठेतरी घंटागाडीला स्पीकर वापरणे बाबत परवानगी द्यावी यासाठी महानगरपालिकेने पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे.एकूण 57 गाड्यांचा प्रस्ताव पोलिसांकडे देण्यात आला आहे .पोलिसांनी सर्व गाड्यांचे पेपर आणि सर्व चालकांचे  पोलीस पडताळणी दाखले  मागवून घेतली आहे . सर्व कागदपत्रे तपासून  त्यानंतर घंटा गाड्यांना परवानगी द्यायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे मात्र परवानगी देताना कोणतीही गाडी एका जागी उभा राहूनच लाऊड स्पीकर वाजू शकते असा नियम सांगतो मात्र शहरात या घंटागाड्या चौफेर फिरत असताना त्यावर  स्पिकर सतत चालू असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version