अहमदनगर दि.२० जानेवारी-
अकोला येथे नुकतीच महाराष्ट्र मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धा
(Masters Athetics Association)
पार पडली सर्वनासाठी खुल्या असणाऱ्या या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलिसांनी सहभाग घेतला होता तसेच विविध स्पर्धेत यश मिळवत पदकांची लायलूट केली आहे.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पुष्पा सोनवणे यांनी भालाफेक आणि गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हा मुख्यलयात कार्यरत असणाऱ्या पुनम आरणे यांनी गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकबला असून मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षा मध्ये कर्तव्यावर असणाऱ्या अर्चना काळे यांनी अनुक्रमे १००,२००,४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक पटकावले आहे.
या तीन महिला पोलिसांच्या या उत्तुंग कामगिरी मुळे पोलिसदलाची मान उंचावली असून महिला पोलिसांनी आपल्या पोलीस दलातील कर्तव्या बरोबर कुटुंब सांभाळून आशा स्पर्धा मध्ये सहभागी होऊन यश मिळवणे ही खूप कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
पदक मिळालेल्या तीनही महिला पोलिसांचा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.