Home जिल्हा मुख्य विद्युत निरीक्षकांच्या अवहालामुळे थंडावला जिल्हा रुग्णालयातील अग्नी तांडवाचा तपास

मुख्य विद्युत निरीक्षकांच्या अवहालामुळे थंडावला जिल्हा रुग्णालयातील अग्नी तांडवाचा तपास

अहमदनगर प्रतिनिधी
सहा नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड वॉर्ड ला आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर या प्रकरणात नेमका दोष कुणाचा याबाबत अनेक तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप झाले राज्य मंत्रिमंडळातील सहा ते सात मंत्र्यांनी या ठिकाणी भेट देऊन सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. तर या घटनेत मृत झालेल्या कुटुंबियांना सात लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, महावितरण कंपनी आणि महानगरपालिका या संस्थांनी एकमेकांवर जबाबदारी ढकल्याने पोलिसांसमोर या घटनेचा तपास करणे हे एक मोठे आव्हान झाले होते. कारण यामध्ये संपूर्ण तांत्रिक बाबीवर पोलिसांना तपास करायचा होता त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक विभागाचा अहवाल मागून घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनीही अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. आणि त्यांच्या पाहणी अवहाल विधुत विभाग पोलिसांना सादर करणार आहे अजून महाराष्ट्र शासनाच्या मुख्य विद्युत विभागाकडून अहवाल प्राप्त न झाल्यामुळे हा तपास सध्या थंडावला आहे हा अहवाल आल्यानंतरच पोलिसांची तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार असून आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version