- अहमदनगर दि.२८ डिसेंबर
व्हाट्सअप आणि फेसबुक वर एक मिनिटात लोन घ्या असे अनेक मेसेज रोज येत असतात त्यात काही गरजू लोक फसतात आणि त्या मेसेज वर फॉलो करत जाऊन झटपट लोन मिळतात. काही दिवस गेल्या नंतर मात्र लोन घेणाऱ्यांवर जी परिस्थिती उदभवते ती फार भयंकर असते. कारण हे ऑनलाईन लोन घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा व्याजदर जो सांगितला जातो तो व्याज दर न आकारता प्रत्यक्ष वेगळाच व्याजदर असतो.
कर्जदारला पहिल हफ्ता भरण्याचा मेसेज जेव्हा येतो तेव्हा कळते कर्जा पेक्षाही दुप्पट पैसे व्याजा मध्ये भरावे लागणार असल्याचं त्याला समजत. त्यामुळे कर्जदार याबाबत जेव्हा त्या ऑनलाईन कंपनीशी संपर्क करतो तेव्हा समोरून थेट त्याला शिवीगाळ करण्यात येते. यावरच न थांबता जेव्हा कर्जदार ऑनलाईन कर्ज घेत असतो तेव्हा कंपनी कडून काही लिंक आपल्याला पाठवल्या जातात.लोन घेण्याच्या नादात कर्जदार कंपनी सांगेल त्या लिंकवर जाऊन त्यांचे नियम मान्य करत असतो आणि नकळत तो स्वतःच्या मोबाईल मधील सर्व नंबरचा डेटा त्यांच्या स्वाधीन करून टाकतो याचा फायदा घेऊन या ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपनी कडून आपल्या मोबाईल मधील सर्व संपर्क क्रमांकावर फोन केले जातात आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत कर्जदारचे नाव सांगून पैसे बुडवल्याचे सांगितले जाते.त्यामुळे कर्ज घेणाऱ्याला प्रचंड मनस्ताप होतो तर त्याच्या मोबाईल मध्ये जतन केलेल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना त्याचा त्रास होऊ लागतो.
कर्ज वसूल करणाऱ्या या महिला बोलत असतात आणि अत्यंत घाण घाण शिवीगाळ केली जाते.असे प्रकार नगर शहरात अनेक ठिकाणी घडत असून अनेक ऑनलाईन कर्जदार या त्रासाला कंटाळले आहेत. याबाबत काही कर्जदारांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून कर्ज फेडण्यास आम्ही तयार आहोत मात्र मित्रांना आणि नातेवाईकांना देत असलेल्या त्रासापासून आमची सुटका करा अशी मागणी या कर्जदारांनी केली आहे.-
कर्जदार पैसे देण्यास तयार होतो मात्र त्याच्या कडून कर्जा पेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम वसूल केली जाते. नकार देताच फोन चा खेळ सुरू होतो आणि अखेर तो माणूस वैतागून जातो.त्यामुळे नागरिकांनी फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळणाऱ्या झटपट लोनच्या मागे न जाता विचारपूर्वक लोन घ्यावे अन्यथा आपल्यावर अशी पश्चातापाची वेळ येऊ शकते आणि मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आपली मान शरमेने खाली जाऊ शकते.
प्लॉट, फ्लॅट,बंगले,दुकाने,खरेदी विक्री साठी एक वेळ संपर्क करा.सार्थ इस्टेट एजन्सी 8999306565