Home जिल्हा रशिया आणि युक्रेन युध्दा मुळे खाद्य तेलाचे भाव भडकले आजची सूर्यफूल तेलाची...

रशिया आणि युक्रेन युध्दा मुळे खाद्य तेलाचे भाव भडकले आजची सूर्यफूल तेलाची किंमत पाहून व्हाल थक्क

 

अहमदनगर दि २० मार्च

रशिया आणि युक्रेन युद्धा मुळे ब्रॅण्डेड सुर्यफुल तेलाच्या किमतीआतापर्यंत उच्चांकवर पोहचल्या आहेत सूर्यफूल तेलाचा दर हा प्रतिलिटर 190 वर पोहोचला असल्याने आता ग्राहकांना सूर्यफूल तेलाचा पंधरा लिटरच्या डब्बा घेण्यासाठी तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम तेल आयाती वर झाला असल्याने काही महिन्यांपूर्वी एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयांना मिळणारी तेलाची पिशवी आता १७० ते १९० रुपयांना झाली आहे.

अहमदनगर शहरातील रविवारच्या भावांवर नजर टाकली असता नगरकरांना थोडाफार दिलासा मिळाला मिळाला आहे सोयाबीन तेल 15 लिटर चा तेल डब्बा १९०० वरून थेट२७०० रुपयांना गेला होता मात्र मागील दोन तीन दिवसाखली याची किंमत २५०० ते २६०० रुपयांवर स्थिरावली आहे तर सूर्यफूल तेल नगर शहारत 2900 रुपयांना १५ लिटर डब्बा मिळतोय.

युद्धाआधी हेच दर दोन हजाराच्या आसपास होते मात्र थेट सहाशे ते सातशे रुपयांनी तेलाचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version