अहिल्यानगर दिनांक 11 जून
राजकारणात निस्वार्थी व निर्मळ मनाची माणसं खूप कमी असतात अशांपैकी एक म्हणजे अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक युवा नेते धनंजय जाधव यांचे नाव घेता येईल.नेतृत्वाबरोबर कर्तृत्वाची जोड लाभलेले व्यक्तिमत्व ,शांत , संयमी , जबाबदार युवानेतृत्व ,मोठ्या मनाचा जिंदादील माणूस ,तन , मन , धनाने समाजसेवेसाठी चोवीस तास तत्पर असणारा तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर आपल्या मितभाषी व सुसंस्कृत स्वभावाने अधिराज्य गाजवणारे धनंजय भैया कृष्णाभाऊ जाधव यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
घरात लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवत आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून राजकारणात प्रवेश करत राजकीय पलटावर कामाचा एक वेगळा ठसा उमटवून आपले नावलौकिक कमावणारा नेता म्हणून धनंजय जाधव यांच्याकडे पाहता येईल.
माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय कृष्णाभाऊ दत्तात्रय जाधव यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोफखाना परिसरात गोर गरीब नागरिकांची सेवा करून नगरसेवक ते माजी उपनगराध्यक्ष म्हणून ज्यांची कारकिर्दी आजही नगरकरांच्या स्मरणात आहे अशा स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांनी राजकारणात ठरवून दिलेल्या पायंड्या नुसार त्यांचे सुपुत्र धनंजय जाधव आपली वाटचाल करत आहेत. सिद्धेश्वर तरुण मंडळ, जंगुभाई तालीम ट्रस्ट, साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने वर्षभर विविध नागरिकांची सेवा धनंजय जाधव नियमितपणे करत असतात. अडल्या-नडलेल्यांचा साथी म्हणजे धनंजय जाधव यांचे नाव तोफखाना परिसरात घेतले जाते.
विद्यार्थी चळवळीतून आपल्या कर्तुत्वाची चुणूक दाखवत सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून शहरात काँग्रेस पक्षाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते सत्यजित तांबे यांच्या खांद्याला खांदा लावून धनंजय जाधव यांनी नगर शहरात काँग्रेस पक्ष वाढवला होता. धनंजय जाधव यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला. 2022 मध्ये त्यांनी भाजपच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. सर्वात जास्त सदस्य नोंदणी करून त्यांनी भाजपमध्येही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सावली म्हणून धनंजय जाधव सध्या नगर शहरात विकासाचे काम करत आहेत.
शिर्डीच्या साईबाबांची एक अनोखे नाते असल्यामुळे साई द्वारका ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी मदत करत असताना साई बाबांनी दिलेली शिकवण अखंडपणे नागरिकांच्या स्मरणात राहावी यासाठी युट्युब च्या माध्यमातून छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म द्वारे साईबाबांची शिकवण प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं काम धनंजय जाधव यांनी केले आहे. राजकारणी वकील आणि समाजसेवक अशा अनेक पदव्या त्यांच्याभोवती असल्या तरी नागरिकांच्या आणि प्रभागातील मतदारांच्या मनातील हक्काचा माणूस म्हणून धनंजय जाधव यांच्याकडे पाहिले जाते.
मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट मध्ये हातखंडा शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा , उद्योग अशा सर्वच क्षेत्रांवर मजबूत पकड असणारे समाजकारण करताना चमकोगिरीला फाटा देऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व अडीअडचणी तळमळीने सोडवणारा नेता म्हणून धनंजय जाधव यांची ओळख नगर शहरात आहे.
नुसतेच राजकारणात सक्रिय न राहता हॉटेल व्यवसायात त्यांनी गगन भरारी घेतली आहे त्यामुळे उद्योग व्यवसायातही त्यांनी आपल्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवला आहे.
मध्यंतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न भेटला असताना
त्यावेळी ‘ओबीसी’मधील आरक्षणाचा वैयक्तिक लाभ सोडत असल्याचे धनंजय जाधव यांनी जाहीर केलं होत. तसं जाहीर करणारे ते राज्यातील पहिले ओबीसी ठरले. जातपात धर्म या पलीकडे जाऊन सतत अहोरात्र जनतेची सेवा करण्याचा ध्यास घेऊन धनंजय जाधव पुढील वाटचाल करत आहेत. त्यामुळे निश्चितच पुढे जाऊन एका उंच शिखरावर नेतृत्व करताना नगरकरांना पाहायला मिळतील.