Home जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ पाथर्डी...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून मोटारसायकल रॅली

पाथर्डी:-दि.५ जानेवारी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.कालीचरण महाराजासह छत्रपती शिवाजी महाराज, जय श्रीराम , अशा घोषणा रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी दिल्या.हातात भगवा झेंडा तोंडवर मास्क अशा पध्दतीने रॅली पार पडली.


काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले. त्याच्या समर्थनार्थ मिरी येथे हिंदू संघटनेच्या वतीने हातात भगवे झेंडे घेत रॅली काढली.मागील काही दिवसांपूर्वी कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.त्यामुळे याबाबत चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

एकीकडे या महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढली आहे. रॅलीची सुरुवात मिरी गावातील बाजारतळ येथून करण्यात आली. हनुमान मंदिर, बसस्टॅण्ड परिसरमार्गे जाऊन बाजारतळावर घोषणाबाजी करून रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत सोमनाथ झाडे, आकाश धनवटे, किरण शेळके, अनिकेत पटारे,शुभम मोटे, बबन केरकळ,मनोज शिंदे,गौतम गवळी,अजय मरकड,सौरभ घोरपडे, रोहित गवळी सहभागी होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version