Home विशेष लाव रे तो व्हिडीओ…अहमदनगर जिल्ह्यात वादग्रस्त ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होण्याची जणू स्पर्धाच.....

लाव रे तो व्हिडीओ…अहमदनगर जिल्ह्यात वादग्रस्त ऑडिओ व्हिडिओ व्हायरल होण्याची जणू स्पर्धाच.. आता या नगरकरांच्या समस्या सोडवणाऱ्या सावेडीच्या त्या कार्यालयातील एकाचा व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर दि.७ फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्यात आणि शहरात सध्या काही वादग्रस्त व्हिडीओ, ऑडिओ क्लिप व्हायरल होण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. कधी पोलिसांच्या देवाण घेवणीचे ऑडिओ व्हायरल झालेत तर कधी हानीट्रॅपचे व्हिडिओ तर तथाकथित पत्रकारांच्या फुकट जेवणाचे ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या मध्ये आता आणखी एक भर पडली असून अहमदनगर शहराच्या समस्या सोडवणाऱ्या सावेडी मनपा कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये दोन जणांचा संवाद स्पष्ट ऐकू येत असून काही रक्कम देवाण घेवाण होत आहे. रक्कम कशासाठी घेतली याचे कारणही स्पष्ट ऐकू येत आहे.रक्कम देणारा माणूस हात जोडून पैसे देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येतय.

मनपा कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामाने चर्चेत असते आर्थिक भ्रष्टाचारावरून काही अधिकारी लाच लुचपतच्या जाळयात अडकले आहेत तर दोन दिवसांपूर्वी एक अधिकारी निलंबित झाला आहे.

मनपा कार्यालयातील कामकाजा बाबत आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप लोकप्रतिनिधीसह नागरिक नेहमीच करत असतात. मात्र अद्याप पर्यंत असा व्हिडीओ कधी व्हायरल झाला नव्हता मात्र आता व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version